वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे आज पासून कामबंद आंदोलन

मुंबई:राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टर आजपासून नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट (मार्ड) संघटनेने निवेदनाद्वारे कळवले .

                                                                                                    कोलकत्ता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा निषेधार्थ म्हणून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे .या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे मार्ड संघटनेने सांगितले आहे.

🤙 8080365706