कोल्हापूर: कोल्हापूर मध्ये गेल्या सात महिन्यात 158 मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. काही मुली शालेय वयातच प्रेमाच्या जाळ्यात अडकतात अल्लड वयात समज नसल्याने त्या सहज अमिषाला बळी पडतात . शाळेला जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली मुलगी परत येतच नाही . त्यामुळे नातेवाईकांना पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागते.
पोलीस ठाण्यात १५८ मुली बेपत्ता झाल्याची नोंद असून ,यातील १४४ मुलींचा शोध घेण्यात पोलीस व नातेवाईकांना यश आले आहे. तर 14 मुलींचा शोध अजूनही सुरूच आहे.
सापडलेल्या मुलींची समुपदेशन करून बाल न्यायालयाच्या आदेशाने त्यांना पालकाकडे सोपवले तर काही मुलींची रवानंगी बालसुधारगृहात केली.