(पंत बावडेकर कुटुंब व शैक्षणिक समूह शाहू महाराजांच्या पाठीशी, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींनी साधला संवाद. )
कोल्हापूर : शाहू महाराज हे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे. जनतेला काय पाहिजे, कशाची गरज आहे हे ओळखून ते देण्याची क्षमता, प्रगल्भ विचार त्यांच्याकडे आहेत. सर्व समावेशक असणारे हे व्यक्तिमत्व लोकसभेसाठी स्वतःसाठी नव्हे तर केवळ समाज हित समोर ठेवून लोकसभा निवडणुकीला उभे आहेत. महाराज आपले आहेत असे समजून सर्वांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करायचे आहेत. शाहू महाराजांची उमेदवारी कोल्हापूरसाठी मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन निलराजे बावडेकर यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी निलराजे बावडेकर कुटुंब व बावडेकर शैक्षणिक समूहातील सदस्यांची भेट घेऊन सहकार्याचे आवाहन केले. यावेळी निलराजे बावडेकर व नीतादेवी बावडेकर यांनी पंत बावडेकर कुटुंब व बावडेकर शैक्षणिक समूह शाहू महाराजांच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले.
यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या, छत्रपती घराणे व पंत अमात्य घराणे यांचे यांचे नाते फार जुने आहे. देशातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, कोल्हापूर जिल्ह्यात दिल्लीतून विकासकामे आणण्यासाठी आणि समाजात चांगले विचार रुजविण्यासाठी सुसंस्कृत, अभ्यासू, विकासाचे व्हिजन असणारे, सर्वांना सोबत घेऊन जाणारे खासदार प्रतिनिधी पाहिजेत. या गोष्टीचा योग्य विचार केल्यास शाहू महाराज यांचेच नाव पुढे येते. जग झपाट्याने पुढे जात आहे, अशा वेळी एकदा अयोग्य व्यक्ती निवडली तर २० वर्षे कोल्हापूर मागे पडेल. त्यामुळे सर्वांनी सजग होऊन शाहू महाराजांना निवडून द्यावे असे आवाहन केले.
नीतादेवी बावडेकर म्हणाल्या, शाहू महाराज हे सर्वांचा आदर करणारे आहेत. ज्या ज्या छत्रपती घराण्याने आम्हाला नेहमीच आपले मानले आहे. शाहू महाराजांना भेटायला कुणाला काही अडचण आहे असे मी अजिबात मानत नाही. कोल्हापूरच्या विकासासाठी, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी महाराज निश्चितच सरस कार्य करतील हा विश्वास आहे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. यावेळी बावडेकर शैक्षणिक समूहातील सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.