दिल्ली: ईपीएफओने पेटीएमला झटका दिला असुन ईपीएफओने पेटीएम पेमेंट्स सोबत जोडलेल्या खात्यांना अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जर कोणत्या खाते धारकाने निर्धारित मुदतीपूर्वी त्यांचे खाते अपडेट केले नाही तर, त्यांच्या खात्यातून दरमहा कापलेली रक्कम फेब्रुवारीनंतर थांबेल. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवेवर बंदी घातल्यानंतर हा आदेश आला आहे.RBI नंतर आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने देखील पेटीएम पेमेंट्स बँकेशी जोडलेल्या ईपीएफ खात्यांमध्ये व्यवहार करण्यास बंदी घातली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेटीएम पेमेंट बँक खात्यांशी जोडलेल्या सर्व EPF खात्यांमध्ये ठेव किंवा क्रेडिट व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. EPFO ने २३ फेब्रुवारी २०२४ पासून आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड खात्यांशी जोडलेल्या EPF खात्यांमधील दावे निकाली काढण्यापासून रोखले आहे.