दोनवडे प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील खुपीरे येथील बलभीम विकास संस्थेच्या 4 संचालकानी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले तर एका संचालकाने संस्थेकडे यापूर्वीच राजीनामा दिला आहे.

अशोक पाटील. दिनकर जांभळे, विष्णु सदाशिव पाटील व रंगराव हराळे असे 4 राजीनामे करवीर सहनिबंधकाच्याकडे आज दिलेत.तर जितेंद्र पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा यापूर्वीच दिला आहे. या राजीनामासत्रामुळे राजकीय व सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
