सद्गुरु बाळूमामा फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात 289 जणांचे रक्तदान

मुरगुड (प्रतिनिधी) : श्री बाळूमामाच्या जन्मकाळ उत्सवा निमित्य सद्गुरु बाळूमामा विकास फाउंडेशन व अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी 289 रक्तदात्यांनी रक्तदान केले
रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री बाळूमामा निसिम भक्त कुंडलिक ज्ञानू पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाध्यक्ष स्थानी माजी सरपंच एम.डी. पाटील हे होते. यावेळी रक्तदात्यांना सरपंच विजयराव गुरव यांच्या हस्ते घोंगडी भेट देण्यात आली.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश खापरे, युवराज पाटील तंटामुक्त अध्यक्ष एल.जी. पाटील , सागर पाटील, एस. के. पाटील, अनिल पाटील, नामदेव पाटील, समीर पाटील, शिवप्रताप पाटील शशिकांत पाटील ,सत्यजित गुरव ,हेमंत पाटील, गणेश खेबुडे, निलेश वास्कर प्रवीण पाटील उपस्थित होते.