कोविड प्रतिबंधात्मक लसीबाबत इलॉन मस्क यांचा खळबळ जनक दावा

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आणि एक्स कंपनीचे (ट्विटर) मालक असलेल्या इलॉन मस्कने एक खळबळजनक दावा केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे आपल्यावर रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली होती, असं मस्कने म्हटलं आहे.

इलॉन मस्कने आपल्या एक्स हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसींची परिणामकारकता कशी 100 टक्क्यांवरून कमी होत होत ती 20 टक्क्यांवर आली आहे, हे सांगणाऱ्या हेडलाईन्स दिल्या आहेत.

‘तुम्हाला हे माहिती आहे का?’ असंही मस्कने यूजर्सना विचारलं आहे.अनिवार्य करणं विचित्रयाच थ्रेडमध्ये मस्क म्हणतात, की कोविड प्रतिबंधात्मक लसी घेणं अनिवार्य करणं हे अगदी विचित्र होतं. बायडेन यांनी दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने रोख लावली, अन्यथा लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे निर्देश स्पेस एक्स किंवा इतर कंपन्यांना दिले गेले असते.”अर्थातच, आम्ही असं काही केलं नसतं. लस न घेणाऱ्या कंपनीतील चांगल्या लोकांना काढून टाकण्याऐवजी मी तुरुंगात जाणं पसंत केलं असतं.” असंही मस्क म्हणाले.

रुग्णालयात जायची वेळ”मला कोरोनाची कोणतीही लस येण्यापूर्वीच त्याची लागण झाली होती. त्यावेळी प्रवास करण्यासाठी अनिवार्य असल्यामुळे मला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे तीन डोस घ्यावे लागले होते. तिसऱ्या डोसनंतर माझ्यावर जवळपास रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली होती.””ज्या लोकांना अजूनही कोरोनाची लक्षणं दिसत आहेत; ती खरंच आजारामुळे आहेत, की लसीमुळे किंवा कोरोनाच्या उपचारांमुळे?” असा प्रश्नही मस्क यांनी उपस्थित केला.

लसींवर आहे विश्वासमस्क पुढे म्हणतात, की “माझा लसींवर नक्कीच विश्वास आहे. मात्र, उपचार हा आजारापेक्षा भयानक असू शकत नाही. लसीच्या प्रभावीपणाबाबत सुरू असलेली चर्चा थांबवू नये. सिंथेटिक mRNA वापरूनही मोठ्या प्रमाणात आजार बरे केले जाऊ शकतात. त्यामुळेच, एखादी वाईट गोष्ट टाकून देण्याच्या घाईत चांगली गोष्टही फेकून देण्याची घाई करू नये.”