करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेची सभा : 13 टक्के लाभांश जाहीर

बालिंगा:करवीर तालुका पंचायत समितीची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंचायत समितीच्या शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अतुल आनंदराव कारंडे होते.संस्थेला सन 2022/23 या सालात 22 लाखाच्या वर नफा झाला असल्याचे सांगून सभासदांना 13 टक्के लाभांश व कायम ठेवीवर 12 टक्के व्याज देण्याची घोषणा यावेळी केली.

तसेच कर्ज मर्यादा वाढ करणे, कुटुंब कल्याण ठेव व मदती मध्ये वाढ करणे, कर्जावरील व्याज दर 0.50 टक्के कमी करणे व नियमित कर्ज फेड करणाऱ्या कर्जदारांना व्याजावर 0.50 टक्के व्याजदरात रिबीट देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.याबाबत उपस्थित सभासदांनी संस्थेच्या कामकाजा विषयी समाधान व्यक्त केले.सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष कारंडे व मानद सचिव एम. ए. देसाई यांनी दिली. विषय पत्रिके वरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेत सेवानिवृत्त सभासद व गुणवंत विध्यार्थी याचारोख रक्कम व प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी उपस्थितीतांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष सचिन तारदाळे यांनी केले.सभेस संचालक सरदार नानासो जाधव. यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा आपल्या मनोगतात मांडला.

सर्व सभासदांनी संस्थेकडे ठेवी ठेऊन सहकार्य करावे असे आवाहन केले.सभेमध्ये बी. व्ही. इंगवले, एस. एस. दिंडे, एस. डी. पाटील,एम. बी. खाडे. व्ही. बी. राबाडे,अशोक मुसळे. यांनी चर्चेत भाग घेऊन सूचना मांडल्या. सभेला संस्थापक व्ही. पी. साबळे,मानद सचिव एम. ए. देसाई,अतुल कारंडे, सचिन तारदाळे,सुधीर मगदूम,सरदार जाधव, महादेव मोरे,महादेव डोंगळे, उत्तम पाटील, सागर पोवार,संजय देसाई, फिरोजखान फरास, सुरेखा सुतार, प्रभावती माने,आदिसह सरदार दिंडे, बी. एस. कांबळे,अशोक पाटील, अशोक मुसळे,बाजीराव इंगवले,एस. डी. पाटील. आदी सभासद उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक फिरोजखान मुबारक फरास. यांनी मानले.