इस्रोकडून PSLV-C54 रॉकेट लाँच ….

श्रीहरीकोटा ; आज PSLV-C54 रॉकेट लाँच करण्यात आलं आहे. इस्रोकडून ओशनसॅट-3 सह 8 नॅनो सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे.

श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून पीएसएलवी-सी54-इओएस-06 रॉकेटने उड्डाण केलं आहे. या रॉकेटमधून ओशनसॅट 3 उपग्रह आणि 8 नॅनो म्हणजे लहान उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेट लाँचरची ही 24 वी मोहिम आहे.ओशनसॅट 3 ओशनसॅट-3 हा 1000 किलो वजनाचा उपग्रह आहे. हा उपग्रह समुद्र आणि पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरणाचा अभ्यास करणार आहे. याशिवाय भारताच्या सागरी क्षेत्रासह मित्र देशांच्या सागरी भागातील क्लोरोफिल, फायटोप्लँक्टन, एरोसोल आणि प्रदूषणाची तपासणी करण्यास मदत करेल. या सॅटेलाईटमुळे संभाव्य चक्रीवादळाची माहिती मिळू शकेल, त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल.

🤙 9921334545