गौतमी विरुद्ध मनसे आक्रमक….

मुंबई : गौतमीच्या त्या अश्लील डान्सची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेक पक्षांनी आणि लावणी सम्राज्ञींनी गौतमीवर टीका केली आहे. अशातच आता मनसे पक्षानं गौतमीवर निशाणा साधला आहे.

गौतमी पाटील प्रकरणावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.गौतमीच्या डान्सला आवर घाला अन्यथा गृहमंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फोडू असा थेट इशारा देण्यात आला आहे.

मनसे विद्यार्थी सेनेकडून ही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. विद्यार्थी सेनेकडून पोलीस महासंचालकांकडे पत्र लिहून तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सवर मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्व काकडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.जालन्यातील सेवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकामार्फत पोलीस महासंचालकांडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटलंय, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अनेक कलाकार आपली संस्कृती जपत कला सादर करतात. मात्र गौतमी पाटील हेतू पुरस्पर अश्लील हावभाव करत आहे.