सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे १० मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन !

कोल्हापूरसनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त (वैशाख कृष्ण सप्तमी) सनातन संस्था ‘रामराज्य निर्माण अभियान’ राबवत आहे. या अभियानांतर्गत हिंदू समाजात रामराज्य आणि आदर्श राष्ट्र उभारणीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने रविवार, १० मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर येथे ‘हिंदू ऐक्य दिंडी’चे आयोजन करण्यात येत आहे. ही दिंडी कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी येथून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक (शिवतीर्थ) येथे संपेल. रामराज्य स्थापनेच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता, देवतांना साकडे घालणे, साधना प्रवचनांचे आयोजन करणे, असे उपक्रमही राबवण्यात येत आहेत.

 

 

 

हिंदू एकतेच्या शक्तीप्रदर्शनात ‘एक हिंदु’ म्हणून सहभागी व्हा!

हिंदु धर्मियांना जात, प्रांत, संप्रदाय, भाषा यांत विभाजित करण्याची कारस्थाने रचली जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर हिंदूऐक्याचा विशाल अविष्कार दाखवणे आवश्यक आहे. त्यासाठी या दिंडीचे आयोजन केले आहे. या हिंदु एकता दिंडीत सहभागी होणारे हिंदू पारंपारिक वेशभूषा परिधान करून नामजप करत, तसेच काही जण भजने म्हणत वारकरी परंपरेचे दर्शन घडवणार आहेत. राष्ट्रपुरूष, क्रांतीकारक, पराक्रमी हिंदु राजे यांनी केलेल्या महान कार्यातून बोध घेण्यासाठी प्रबोधनही या फेरीत केले जाणार आहे. या फेरीत विविध संप्रदाय, तसेच हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार असून काळाची आवश्यकता ओळखून सध्याच्या स्थितीला स्वरक्षण, प्रथमोपचार यांविषयीचे प्रशिक्षण लोकांनी शिकून घ्यावे याविषयीही जनजागृती या वेळी करण्यात येणार आहे. या फेरीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संघटना, सामाजिक संघटना, विविध संप्रदाय सहभागी होणार आहेत. तरी संघटितपणाचा संदेश देणार्‍या प्रबोधनपर ‘हिंदू एकता दिंडी’त समाजातील लोकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. या दिंडीच्या निमित्ताने विविध मंडळे,सामाजिक संस्था, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्था, लोकप्रतिनिधी यांना भेटून निमंत्रणे देण्यात येत आहेत.

 

🤙 8080365706