पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; उज्वला गॅससाठी २०० रुपये अनुदान

नवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या देशातील नागरिकांना केंद्र सरकार खूशखबर देणार असून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे. तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर २०० रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. पेट्रोलवरील ८ रुपये तर डिझेलवरील ६ रुपये उत्पादन शुल्क कमी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच महागाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि यासाठी 6100 कोटी रुपये आर्थिक भार येणार आहे.