एकतर्फी प्रेमातून भरदिवसा विद्यार्थिनीची हत्या; कॉलेजजवळून २०० फूट ओढून नेत भोसकले

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थिनीची कॉलेजजवळून २०० फूट ओढून नेत हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मृत तरुणी ही १९ वर्षीय विद्यार्थींनी असून ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. कॉलेजजवळून ओढत नेत तिची हत्या करण्यात आली आहे. देवगिरी महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती आहे. आरोपीने तरुणीला ओढत नेत तिची हत्या केली. यापूर्वी युवक व विद्यार्थिनीमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे.भर दिवसा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.