कच्च्या तेलाच्या किमती कमी होवूनही पेट्रोल, डिझेलचे दर वाढले

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका कधी विझणार आणि महागाईतून दिलासा कधी मिळणार, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या तोंडी आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरत असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ४० पैसे लिटरची वाढ झाली.

२२ मार्चपासून देशात सुरू झालेली इंधन दरवाढ काही थांबण्याचे नाव घेत नाही. १४ दिवसांत १२ वेळा झालेल्या इंधन दरवाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी ४० पैशांची वाढ केली. यामुळे मुंबईत पेट्रोल ११८ रुपये ८३ पैसे आणि डिझेल १०३ रुपये ७ पैसे लिटर झाले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल १०३ रुपये ८१ पैसे आणि डिझेल ९५ रुपये ७ पैसे लिटर झाले आहे. १४ दिवसांत १२ दिवस झालेल्या दरवाढीमुळे पेट्रोल ८ रुपये ४० पैशांनी महागले.