गडहिंग्लज : तालुक्यातील कोरोनामुळे व मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाकर कारेकर आरक्षणाचे कार्यक्रम जाहीर झाल्याने गावपातळीवरील राजकारण तापू लागले आहे .
तालुक्यातील महागाव कडगाव कौलगे नेसरी आधी मोठ्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे 25 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 हा हरकती-सूचना स्वीकारल्या जाणार आहेत 15 मार्च पर्यंतप्रांताधिकारीयांचेकडे हरकती सुनावणी होणार आहे25 मार्चपर्यंत जिल्हाधिकारी या ग्रामपंचायतीचे प्रभाग अंतिम रचना करणार आहेत.
गावपातळीवर गटातटाचे राजकारण गरमागरम होणार असून यामुळे राजकीयधुरळा गल्लोगल्ली उडणार आहेइच्छुक मंडळी आपला प्रभाग राखीव अगर आपल्या सारखा रहावा यासाठी देव पाण्यात घातले जात आहेत.
विशेष म्हणजे नेसरी कडगाव महागाव किती मोठी गावे लोकसंख्या अधिक बड्या राजकीय मंडळींची येथे रेलचेल असते ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कोणा राहिली पाहिजे यासाठी राजकीय मंडळी आटापिटा करीत असतात यामुळे हे वर्ष ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीचा माहोर उडणार आहे.