अधिकाऱ्याच्या टेबलावर चक्क सोडला साप

इचलकरंजी : शेतीसाठी दिवसात दहा तास वीजपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी सर्व ठिकाणी स्वभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होत असताना इचलकरंजीत शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या टेबलावरच साप सोडल्याने तारांबळा उडाली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेच चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी जोरजोरात घोषणा देत कार्यकारी अभियंता राठी यांना घेराव घातला. या प्रकारची माहिती मिळताच महावितरण कार्यालयात पोलिसही दाखल झाले.दिवसा वीज पुरवठ्याबाबतची मागणी वरिष्ठ कार्यालयास लेखी स्वरुपात दिल्यानंतर कार्यकर्ते शांत होत कार्यालयामधून निघून गेले.दरम्यान, स्वभिमानी शेतकरी संघटनेतील तिघांच्यावर शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.