विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

कोल्हापूर : कुरुंदवाड परिसरातील एका शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित शिक्षक अजित दिवटे याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

पीडित विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 23 जून 2026 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळेत विद्यार्थिनीच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. त्यानिमित्त शिक्षकाकडून वर्गात चॉकलेटचे वाटप सुरू होते. त्यावेळी संशयित अजित दिवटे याने विद्यार्थिनीला थांबवून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.

 

हा प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने घरी जाऊन कुटुंबीयांना घडलेली घटना सांगितली. त्यानुसार कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि गुन्हा नोंद करण्यात आला.

 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संबंधित शिक्षकाला गावकऱ्यांनी मारहाण केल्याची चर्चा आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. या प्रकरणामुळे गावात असंतोषाचे वातावरण आहे.

 

पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत.

 

 

🤙 8080365706