कोल्हापूरातील करूळ घाटातील वळणावर पोकलॅन मशीन घेऊन जाणारा कंटेनर आज (दि. १२) पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामुळे घाट मार्गातील वाहतूक ठप्प झाली आहे.
वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातामुळे गगनबावडा येथील वाहनांची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खड्डेमय करूळ घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, पोकलॅन मशीन घेऊन जाणारा कंटेनर (क्र. एमएच ४३- यु ८५६२ ) पुण्याहून गोव्याकडे जात होता. करुळ घाटात एका धोकादायक वळणावर कंटेनरचा अचानक चेस तुटल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे.कंटेनर व पोकलॅन मशीनचे मोठे नुकसान झाले आहे.