शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय रग्बी स्पर्धेत विठ्ठलराव पाटील महाविद्यालयास उपविजेतेपद

कळे : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय रग्बी स्पर्धा दिनांक 11 व 12 फेब्रुवारी रोजी शिवाजी विद्यापीठ क्रीडांगणा वर संपन्न झाली या स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघाने सहभाग नोंदवला होता.

कळे महाविद्यालयाने प्रथमच या रग्बी स्पर्धेत सहभाग नोंदवत दूध-साखर महाविद्यालय बिद्री व कोपार्डे महाविद्यालय यांना पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला फायनल मध्ये कोवाड महाविद्यालयातील तगड्या संघाबरोबर कळे संघाने शेवटपर्यंत झुंज दिली, पण राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेला कोवाड संघ विजेता ठरला व कळे महाविद्यालय उपविजेते ठरले, कळे संघातील प्रणव विजय पाटील, तेजस श्रीपती पाटील ,तेजस तुकाराम पाटील, संकेत बबन चौगुले, निलेश दिलीप पाटील यांनी नेत्रदीपक खेळ केला यांना अजय संजय पाचकटे हर्षवर्धन भगवान पाटील ,ओमकार युवराज पाटील, संतोष सखाराम चौगुले, शुभम श्रीकांत पाटील यांनी साथ दिली यांना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विक्रम यमगेकर व कोच दीपक पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर राक्षसे व संस्था अध्यक्ष माननीय विठ्ठल पाटील साहेब यांचे सहकार्य लाभले त्याचबरोबर डॉक्टर नितीन पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.