कागल मतदारसंघातील हॅम रस्ते कामांच्या दिरंगाईवरून हसन मुश्रीफ यांची नाराजी; मंत्रालयात विशेष बैठकीत दिले तातडीचे निर्देश

मुंबई:कागल विधानसभा मतदारसंघात हायब्रिड अ‍ॅन्यूइटी HAM अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमधील दिरंगाई आणि दर्जाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री भोसले यांनीही कामांमधील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली.  

मंत्री हसन मुश्रीफ यांनी या बैठकीत मतदारसंघातील नागरिकांना होणारा मनस्ताप सविस्तर मांडला. विधानसभा निवडणुकीपूर्वी हॅम योजनेतून मंजूर झालेल्या दोन प्रमुख पॅकेजच्या कामांमध्ये सबलेट आणि बिलांच्या विलंबामुळे अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मंजूर पॅकेजमध्ये `रणदिवेवाडी, कागल, नदीकिनारा, मुरगुड, सेनापती कापशी ते काळभैरी देवस्थान मार्गे गडहिंग्लज – 71 किमी` आणि `बेलेवाडी, हुबळगी, ऊत्तूर ते गडहिंग्लज – 24 किमी` या रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचा समावेश आहे.

 

बैठकीत खालील कामे तात्काळ इस्टिमेट करून मंजुरीसाठी पाठवण्याचे ठरले:

1. कसबा सांगाव आणि मौजे सांगाव गावातील रस्ते

2. कागल शहरातील रस्ते, गटर्स आणि युटिलिटी शिफ्टिंग

3. कागल-मुरगुड रस्त्यावरील सिद्धनेर्ली येथे दूधगंगा नदीवर नवीन पूल

4. मुरगूड शहरातील रस्ते व गटर्स

5. मुरगुड-सेनापती कापशी रस्त्यावर सरपिराजीराव तलावाजवळ एलिव्हेटेड पूल

6. आलाबाद-सेनापती कापशी दरम्यान चिकोत्रा नदीवर नवीन पूल

7. सेनापती कापशी चौकातील रस्ते व सुशोभीकरण

 

सर्व प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

 

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव शरद राजभोज, MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मुख्य अभियंता श्री. हांडे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर यांच्यासह मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, माजी पं.स. सदस्य शशिकांत खोत, नगरसेवक विशाल सूर्यवंशी, सुनिल चौगुले, संदीप भारमल, नितीन कलकुटकी आणि कागल नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता विजय आदी उपस्थित होते.

🤙 8080365706