नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जागेचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर 

कोल्हापूर:करवीर तालुक्यातील श्रीक्षेत्र नंदवाळ येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यमंत्री (गृह) योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठकी संपन्न झाली.

 

नंदवाळच्या रिंगण सोहळ्यासह तीर्थक्षेत्र विकास, भाविकांच्या सुविधा आणि ग्रामस्थांच्या वापरासाठी आवश्यक असलेली गायरान गट क्र. ६३ मधील जागा यापूर्वी भारत राखीव बटालियन क्रमांक ३ व राज्य राखीव पोलीस दलासाठी राखीव करण्यात आली होती. त्यामुळे जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. ग्रामस्थांच्या मागणीच्या अनुषंगाने हा प्रश्न  सातत्याने शासनस्तरावर मांडत आले आहे.

 

तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली १९ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत गावासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. भारत राखीव बटालियनशी संबंधित प्रशासकीय बाबींमुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर या विषयाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सकारात्मक पुढाकारामुळे आणि मी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यापासून ते विविध मंत्रालयीन बैठका आणि संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधण्यापर्यंत हा विषय लावून धरला. त्याचाच परिणाम म्हणून आता मंत्रालयातील बैठकीत या प्रश्नावर पुढील कार्यवाहीला गती देण्यात आली आहे.

 

आजच्या बैठकीत गट क्र. ६३ मधील गावालगतची सपाट जागा तीर्थक्षेत्र विकास तसेच ग्रामस्थांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आले. वनसदृश्य जमिनीबाबत आवश्यक NOC प्रक्रिया पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना तसेच नंदवाळ तीर्थक्षेत्राचा सविस्तर विकास आराखडा (DPR) तातडीने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

कोल्हापूर जिल्हाधिकारी व संबंधित विभागांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मोजणी करून आवश्यक अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.

 

लाखो वारकरी भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेल्या श्रीक्षेत्र नंदवाळचा सर्वांगीण आणि नियोजित विकास व्हावा, यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहील.

 

 

🤙 8080365706