कोल्हापूर:पर्यटन ही एक अशी बाब आहे, जी एखाद्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासोबतच नावलौकिकही मिळवून देते आणि हीच बाब लक्षात घेऊन दाजीपूर अभयारण्यात पर्यटनाच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला.

यावेळी त्यांनी दाजीपूरकडे जाताना सुरंगी या ठिकाणी जंगली प्राण्यांचे आकर्षक स्टॅच्यू तयार करून विकसित होत असलेल्या सेल्फी पॉईंटची पाहणी केली.
हसणे येथील धरणावर कृत्रिम धबधबा तयार करण्याच्या सुरू असलेल्या कामाची आणि माळेवाडी डॅममध्ये करण्यात येत असलेल्या बोटिंग व्यवस्थेचीही माहिती घेतली. तसेच अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आकर्षक कमानीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या कामाचीही पाहणी करण्यात आली.
याप्रसंगी संजय गांधी निराधार समिती तालुका अध्यक्ष मा. दिपक शेट्टी, युवा सेना तालुकाप्रमुख मा. मयुर पोवार, दाजीपूर वन्यजीवचे वनक्षेत्रपाल मा. राजेंद्र घुणकीकर, सरपंच मा. प्रतिभा कोरगावकर, मा. शशिकांत बैलकर, मा. भगवान पाटील, मा. अजय भंडारी, मा. अभिजीत हुपरीकर, मा. शरद पाटील, मा. चैतन्य कोरगावकर, मा. राजेंद्र चव्हाण, मा.विशाल म्हाबळे आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
