करवीर तालुक्यातील लॉजवर छापा;हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा भांडाफोड

 

कोल्हापूर: व्हॉटस्अॅप ग्रुपद्वारे चालवणाऱ्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला व एका पीडित महिलेची सुटका केली असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. करवीर तालुक्यातील वाशी येथील ‘सनराईज

 

लॉज’वर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले तर लॉजमालकासह तिघे पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 

सनराईज लॉजवर पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधून महिलांना पैशांचे आमिष दाखवून बोलावले जात होते. त्यानंतर त्यांचे फोटो काढून ते व्हॉटस्अॅपद्वारे ग्राहकांना पाठवले जायचे. ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळून हा हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आणि उघडपणे चालवला जात असल्याची खात्रीशीर प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून सागर प्रभाकर कांबळे (२८, रा. मिणचे बुद्रुक, ता. भुदरगड) आणि कमलेश कृष्णा पाटील (३०, रा. हेळेवाडी, ता. राधानगरी) यांना अटक केली. लॉजमालक शहाजी एकनाथ वैद्य ऊर्फ सागर पाटील (रा. हेदवडे, ता. भुदरगड), सुहास निचिते (रा. सोळांकूर, ता. राधानगरी), विक्रम दिनकर कांबळे (रा. कासारवाडा, ता. राधानगरी) यांचा शोध सुरू आहे.

🤙 8080365706