कोल्हापूर: परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली ९ मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये ऑटोरिक्षा / टॅक्सी परवान्यांचे खुल्या धोरणास स्थगिती देण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. ऑटोरिक्षा / टॅक्सी नोंदणीसाठी ज्या अर्जदारांना इरादापत्र जारी करण्यात आले होते, परंतु त्या इरादापत्राची वैधता संपली आहे, अशा प्रकरणांत नोंदणी थांबवण्यात आली होती.

परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई इरादापत्राची वैधता संपलेल्या प्रकरणांमध्ये त्यांना वाहन नोंदणी करिता एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इरादापत्राची वैधता संपलेल्या अर्जदारांनी २५ जून पर्यंत वाहनाची नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांचे तर्फे करण्यात आले आहे.
