विविध सीईटी परीक्षांसाठी पन्हाळ्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

कोल्हापूर: एमबीए/एमएमएस-सीईटी 2026 तसेच एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा शांततेत, सुव्यवस्थेत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पन्हाळा उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

 

 

 

 

 

पन्हाळा उपविभागातील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन, सोमवार पेठ, तीन दरवाज्याजवळ, पन्हाळा येथे 12 ते 20 मे या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. या कालावधीत परीक्षाकेंद्राच्या 100 मीटर परिसरात दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक साहित्य, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन व फॅक्स मशीन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्या दिवशी परीक्षा नाही त्या दिवशी हा आदेश लागू राहणार नाही.

 

परीक्षा प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या शासकीय कामकाजासाठी आवश्यक उपकरणांच्या वापरास सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

00000

🤙 8080365706