वेतवडेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

कोल्हापूर : वेतवडे (ता. गगनबावडा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वेतवडे गावातील आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गगनबावडा तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन करताना येथील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या छताखाली एकत्रित येत मोठ्या प्रमाणात मोट बांधण्याचा निर्धार केला आहे.यावेळी तालुक्यातील विविध पदावर पदाधिकारीच्या निवडी करण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष अजित पोवार, कार्याध्यक्ष डॅा. बाळासाहेब पाटील, राजू पाटील, विक्रम पाटील , प्रदीप शिराने, नितेश कोगनोळे, दामोदर पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

🤙 9921334545