आ. अमल महाडिक यांनी महसूल मंत्री बावनकुळेंना केली करवीर तालुक्याच्या विभाजनाच्या प्रस्तावासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती

कोल्हापूर : जिल्ह्याच्या करवीर तालुक्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील ५ लाख तसेच ग्रामीण भागातील ४ लाखाहून अधिक लोकसंख्येचा समावेश होतो.

                       

या तालुक्यामध्ये महानगरपालिकेतील ८७ नगरसेवक,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, ३ आमदार आणि १ खासदार या लोकप्रतिनिधींचे कार्यक्षेत्र असल्यामुळे प्रशासनावरील कामकाजाचा ताण प्रचंड आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी असणारा शासकीय कर्मचारी वर्ग अपुरा असल्यामुळे करवीर तालुक्याचे करवीर तालुका शहर आणि करवीर तालुका ग्रामीण असे विभाजन करण्यासंबंधीचा प्रस्ताव यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केला होता. परंतु काही त्रुटींमुळे या प्रस्ताव शासनाने परत पाठवला होता. अद्यापही हा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने नुकतीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदार अमल महाडिक यांनी भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या करवीर तालुक्याच्या विभाजनाच्या प्रस्तावासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या.

🤙 9921334545