एकट्याने पाहिलेले ते स्वप्न असते,आणि समूहाने पाहिलेले ते सत्य असते ,सुभाष ग्रुपचे विविध क्षेत्रात बहुमोल योगदान : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : वडणगे येथील सुभाष ग्रुपच्या वतीने आयोजित सुभाष चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ आणि विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश गणपती उदाळे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याला आमदार सतेज पाटील उपस्थित राहिले .

 

गेली 35 वर्षाहून अधिक काळ सामाजिक ,राजकीय, क्रीडा, सहकार क्षेत्रात सुभाष ग्रुप कार्यरत आहे. युवकांच्या भक्कम संघटनातून आणि पत्रकार यशवंत लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी सरपंच सचिन चौगले यांच्या नेतृत्वाखाली आता सुभाष पतसंस्था, दूध संस्था स्थापन करून समाजासाठी महत्वाचे योगदान सुभाष ग्रुपने दिल्याचे सांगून तरुण मंडळांची ताकद समाजामध्ये विधायक काम निश्चित करू शकते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर, ज्येष्ठ नेते आणि माजी जि. प सदस्य बी. एच. पाटील , गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासो चौगले, प्राचार्य डॉ. महादेव नरके, पार्श्वनाथ बँकेचे संचालक केवलसिंग रजपूत, वडणगे सेवा सोसायटीचे सभापती उत्तम देवणे, उपसभापती सौ.मंगल शेलार रवींद्र( बी.एच.)पाटील, अण्णासाहेब देवणे, के.एस.पाटील,वाय. के. चौगले, शिवाजी व्हरगे, संजय पाटील, विठ्ठल माने,बंडोपंत पाटील,उत्तम पाटील, वडणगे फुटबॉल क्लबचे अध्यक्ष रवी मोरे, आर बी. देवणे,अजित पाटील यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष विनोद सावंत,प्रवीण चौगले, यांच्यासह सुभाष ग्रुपचे कार्यकर्ते, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545