कोल्हापूर : काळा मारूती मंदिर, आय. जी. एम. हॉस्पिटलजवळ, इचलकरंजी येथे माजी मंत्री मा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या काळा मारूती सांस्कृतिक भवन या भव्य प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन माजी मंत्री मा आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या सांस्कृतिक भवनामुळे परिसरातील सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळणार असून, येथील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमावेळी नंदू पाटील, श्रीकांत टेके मामा, सुभाष तोडकर, वैशालीताई गजगेश्वर, शितल रेडेकर, काजल तोडकर, नम्रता देशमाने, छाया गजगेश्वर, सविता माने, ओम प्रकाश छापरवाल, मिश्रीलाल बजाज, एस सोनी, राहुल डांगे, किशोर मेटे, उमेश कनोजे, तात्यासाहेब पुजारी, रोहन निमणकर, चंदुर रसणे, रंगनाथ रायबागे, शामराव शिंदे, वसंत मेहतर, अर्चना बनसोडे, प्रभा बनसोडे, सचिन दानोळे, अलका सूर्यवंशी, मारुती देसिंगे, शांता देसिंगे, हभप महादेव चौगुले महाराज व काळा मारूती फक्त मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने व कार्यसमर्पणाने हा कार्यक्रम अधिक मंगलमय झाला.