कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज सह ग्रामीण भागात रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी रेशन कार्ड दुकानात गर्दी केवायसी करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याची माहिती,रेशन कार्डवरील मोफत धान्य नियमित सुरू राहण्यासाठी जिल्ह्यातील 4 लाखांवर कार्डधारकांना केवायसी करण्यासाठी बुधवारी एकच दिवस मिळणार आहे. केवायसीसाठी दि.30 एप्रिल ही शेवटची मुदत होती. त्याला मंगळवारी सायंकाळपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली नव्हती. यामुळे वेळेत केवायसी न झाल्यास संबंधितांचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे.
रेशन धान्य घेणाऱ्यांची केवायसी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामधून संबंधितांना खरोखर या धान्याची गरज आहे का? मृत, स्थलांतरितांची नावे वगळण्यात आली आहेत का? आदी माहिती घेतली जाणार आहे. या केवायसीसाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, सध्या असलेल्या दि. 30 एप्रिलपर्यंतच्या मुदतीला वाढ देण्यात आलेली नाही. यामुळे ज्यांची केवायसी राहिली आहे, त्यांना बुधवार हा अखेरचा दिवस मिळणार आहे