आ. राहुल आवाडे यांच्याकडून , इचलकरंजी येथे मैदानाची सखोल पाहणी

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन इचलकरंजी येथे होत असून, या पार्श्वभूमीवर शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल मैदान, इचलकरंजी येथे आमदार राहुल आवाडे यांनी भेट देऊन मैदानाची सखोल पाहणी केली.

 

 

यावेळी विविध क्रीडा संस्थांचे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू तसेच स्पर्धा आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची तपासणी करण्यात आली. मैदानाची गुणवत्ता, खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा, प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, सुरक्षेचे निकष आणि स्पर्धेच्या आयोजनासाठी लागणाऱ्या इतर मूलभूत गरजांचा आढावा घेण्यात आला.
ही राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्रातील अनेक नामवंत संघ आणि प्रतिभावान खेळाडूंना आपली कौशल्ये दाखवण्याची सुवर्णसंधी प्रदान करेल. स्पर्धेच्या आयोजनासाठी स्थानिक प्रशासन, क्रीडा संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून उत्कृष्ट व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक तयारीला अंतिम रूप देण्याच्या सूचना दिल्या. या राज्यस्तरीय क्रीडा सोहळ्यामुळे इचलकरंजीचा क्रीडा क्षेत्रातील महत्त्व वाढेल आणि युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

🤙 9921334545