घरफाळा थकबाकीपोटी घरफाळा विभागाकडून 6 मिळकतीवर सीलची कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना दंडात 80 टक्के सवलत देऊनही काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे  अशा 6 थकबाकीदारांच्या मिळकतीवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विभागीय कार्यालय क्र.1 अंतर्गत देवकर पाणंद व बापू रामनगर परिसरातील 3 मिळकती (महिपती श्रीपती चंद्रेकर, मिनाक्षी चंद्रेकर रु.1,8877/-, पुजा बिल्डर्स ऍ़न्ड डेव्हलपर्स रु.23,596/- व दिलीप धोंडीराम बामणे रू.21651/-), विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत रंकाळा, बाजार गेट, श्री.शाहु उद्यान रोड परिसरातील (मेघानंद कुंजविहार मगनलाल अगरवाले रु.1,40,625/- व ए.बी.पाटील रु.1,61,029/-) तसेच विभागीय कार्यालय क्र.3 अंतर्गत शाहुपूरी 3 री गल्ली या परिसरातील (चेअरमन बाअुरावजी महाजन नागरी पत संस्था रु.6,32,212/-) अशी एकूण रक्कम 9 लाख 97 हजार 990 रुपये थकबाकी असलेने या मिळकतींवर सीलची कारवाई करण्यात आली आहे.

 

तरी शहरातील थकबाकीदारांनी अद्यापही आपला घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी आपला थकीत घरफाळा भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार सदरची मिळकत सील किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.