मुंबई : महाराष्ट्र राज्यातील GBS साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाम. जे.पी.नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखालील दुरदृष्यप्रणालीव्दारे बैठकीचे अयोजन करण्यात आले होते.
यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाम..जे.पी.नड्डाजी यांनी GBS साथीच्या आजाराच्या परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेतला आणि सार्वजनिक आरोग्याच्या या समस्येचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी केंद्रीय आयुषमंत्री नाम.प्रतापराव जाधव साहेब, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ , आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर ,पाणीपुरावठा मंत्री नाम.गुलाबराव पाटील साहेब यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.