चंदगड तालुक्याच्या हरितक्रांती व धवलक्रांतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे : खा. धनंजय महाडिक 

कोल्हापूर : राज्याचे माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित राहून अण्णांचा वाढदिवस साजरा केला व शुभेच्छा दिल्या.

 

 

अण्णांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक व जीवनामध्ये चंदगड तालुक्याच्या हरितक्रांती व धवलक्रांतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आजच्या सद्यपरिस्थितीमध्ये देखील अण्णा चंदगड तालुक्याच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करत असतात. त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीतून तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते. अण्णांना पुढील आयुष्य निरोगीमय, सुखाचे व आनंदाचे जावो, या सदिच्छा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी गुरुवर्य  परशुराम नंदीहळळी, आमदार शिवाजीराव पाटील,  अशोकअण्णा चराटी,  गणपत पाटील,  किसन कुराडे, दीपक पाटील,  ज्योतीताई पाटील,  सचिन बल्लाळ,  शांताराम पाटील,  हेमंत कोळेकर, प्रकाश चव्हाण, संतोष तेली,  अनिरुद्ध केसरकर, बबन देसाई,  नामदेव पाटील, रवी बांदिवडेकर, अनिल शिवणगेकर, अजित व्हनाळकर, मायाप्पा पाटील,  मोहन साबेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.