भाजप संघटनपर्व अभियानाअंतर्गत कबनूर परिसरात घर चलो अभियान

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्व अभियानाअंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कबनूर परिसरात घर चलो अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी आवाहन केले.

 

 

 

 

या उपक्रमादरम्यान नागरिकांची सदस्यता नोंदणी देखील करण्यात आली. जनतेला भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणांची माहिती देत त्यांच्या सहभागाचे महत्त्व पटवून दिले.

आमदार आवाडे म्हणाले ,सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपण या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणावर सदस्यता नोंदणी करा व भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वात आपले अमूल्य योगदान द्या. “आपला सहभागच संघटनाचे बळ आहे!”