महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाचे नवनवीन स्रोत निर्माण केलेत : अरुंधती महाडिक

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था व भाजपा कोल्हापूरच्या वतीने कावळा नाका येथील भागीरथी महिला संस्था ऑफिस येथे नव्याने सभासद झालेल्या महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांशी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी संवाद साधला.

 

भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांची यशस्वीरीत्या संघटन केले आहे व यातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाचे नवनवीन स्रोत निर्माण केले आहेत. याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन सौ. महाडिक यांनी यावेळी केले.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या महिलांना मा. प्रिया चिवटे यांनी प्रशिक्षण दिले. याप्रसंगी कुकिंग, अत्तर, साबण, वॉशिंग पावडर यासारख्या वस्तू बनवण्यासंदर्भात प्रात्यक्षिके करून दाखवली.

यावेळी अनिता ढवळे,  शरयू भोसले,  अन्नू ढेरे,  राजश्री रायकर,  रेखा केसरकर,  भाग्यश्री चौगुले,  ऋतुजा शिंदे,  नम्रता शेट्टी, अस्मिता चव्हाण,  वैष्णवी जाधव यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.