चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आ.अमल महाडिक यांच्या हस्ते

कोल्हापूर : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. शाहूपुरी जिमखाना मैदानावर या स्पर्धा होत आहेत. कोल्हापूर शहरातील विविध उद्योजकांनी या स्पर्धेत घेतलेला सहभाग उल्लेखनीय आहे.

 

 

व्यवसायासोबतच सभासदांच्या क्रीडा कौशल्याला वाव देणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी झंवर ग्रुपचे नरेंद्र झंवर, नीरज झंवर, जाधव इंडस्ट्रीजचे सत्यजित जाधव, राजू पाटील, धनंजय दुग्गे, संजय शेटे, राहुल नष्टे, अजित कोठारी, प्रशांत शिंदे, वैभव सावर्डेकर, जयेश ओसवाल यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.