आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते इचलकरंजीतील चांदणी चौक काँक्रिटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांच्या फंडातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत विठ्ठल मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चांदणी चौक परिसरातील काँक्रिटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

 

 

 

यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपल्या भाषणातून या कामाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि गावाच्या विकासासाठी यासारख्या प्रकल्पांचे योगदान अधोरेखित केले.

विकास कामांबाबत आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की “रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासकामे ही ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाची आहेत. हा प्रकल्प म्हणजे चांदणी चौक परिसरातील ग्रामस्थांना आधुनिक व सुगम प्रवासाची भेट आहे.

यावेळी सरपंच पल्लवी पोवार, नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे, उप सरपंच मृत्युंजय पाटील, माजी सरपंच यशवंत वाणी, भाजपाचे अध्यक्ष भीमराव बन्नै, के जी पाटील प्रवीण पाटील, विजय चौगुले, सचिन चौगुले, योगेश वाणी अमित खोत विनायक देसाई शुभम नलवडे शिवभूषण विभुते सुरेश पोवार, गोगा बाणदार उपस्थित होते