कुंभोज (विनोद शिंगे )
कुंभोज (ता.हातकणंगले) येथील मागासवर्गीय समाजातील विकी सर्जेराव कोले हा गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूर येथील सर्वोदय हॉस्पिटल येथे साधूपिंडाच्या गंभीर आजारावर उपचार घेत आहे परिणामी त्याबाबत ग्रामस्थ व समाजातील काही प्रमुख व्यक्तींनी मदतीचे आवाहन केले होते.
या अनुषंगाने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांनी सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन कुंभोज ग्रामपंचायतचे सदस्य भारती पोतदार, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अरुण पाटील, पोर्णिमा भोसले, शुक्राचार्य जमणे व विनायक पोद्दार व लखन भोसले, यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून सदर व्यक्तीचे सर्व कागदपत्रे पूर्ण करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली.
विनायक पोद्दार यांनी सदर सर्व कागदपत्रे तात्काळ गोळा करून ती त्यांच्याकडे सुपूर्त केली व आमदार यांनी सदर कागदपत्रे मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे दाखल केली परिणामी कागदपत्रे जमा करून चार ते पाच दिवस झाले तरी मुख्यमंत्री सहाय्यता निधी येण्यास विलंब का होत आहे .याची चर्चा सध्या कुंभोज हातकणंगले विधानसभा मतदारसंघात रंगत असून एका सर्वसामान्य मागासवर्गीय परिवारातील रुग्णाला उपचारासाठी अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी मुख्यमंत्री सहायता निधी तात्काळ उपलब्ध झाल्यास सदर युवकाचे उपचार होऊन त्याला व त्याच्या कुटुंबाला आधार मिळू शकतो मुख्यमंत्री सहायता निधी तात्काळ उपलब्ध करण्याची सेवा सुविधा शासनाने सुरू करावी अशी मागणी सध्या कुंभोज परिसरातून जोर धरत आहे. पण मी सदर युवकाला तात्काळ मुख्यमंत्र्यासहिता निधी उपलब्ध झाल्यास एक सर्वसामान्य गरीब कुटुंबाला मोठा आधार मिळणार असून आज पर्यंत सदर युवकाला उपचारासाठी शासनाचा कोणताही निधी उपलब्ध न झाल्याने एखाद्या कुटुंबाची होणारी अवस्था सर्वसामान्य नागरिकाला बघणारी नाही , शासनाने याबाबतीत तात्काळ लक्ष घालून सदर युवकाला सहकार्य करण्याची अपेक्षा सामान्य नागरिकांत व्यक्त होत आहेत.