कोल्हापूर : नुकत्याच भोपाळ येथे पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कुडित्रे येथील नेमबाजी केंद्राच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने यातील सात विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय निवड चाचणी करता निवड झाली . या खेळाडूंचा आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडून कार्यालयावर सत्कार झाला.
यामध्ये वैभव भाऊसाहेब यादव ,शिवराज सुभाष कुंभार, सिद्धी युवराज नाईक , तनिष्का उत्तम तारळे कर, अदिती नितीन हदगल,जानवी पंढरीनाथ चौगले ,प्रथमेश एकनाथ चौगले, या खेळाडूंना पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व नेमबाजी खेळाडू पालक, शिवाजी कुंभार,व कुंभीचे नेमबाजी प्रशिक्षक युवराज चौगले उपस्थित होते.