चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री महोदय व नवनिर्वाचित आमदारांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

 

 

चंदगड विधानसभा मतदारसंघातील या संघटनेमार्फत नेहमीच विविध उपक्रम राबवले जात असतात. त्यांच्या विधायक कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती सरकारमध्ये निवड झालेल्या मंत्री महोदयांचा व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला आहे. याबद्दल चंदगड भाजपा व संघटनेचे कौतुक केले. तसेच या संघटनेच्या पुढील कार्यासाठी नेहमीच पाठबळ देत राहू. असा विश्वास यावेळी दिला.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या शासकीय योजनांची व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारची विकासगंगा सर्वसामान्य नागरिकांच्या दारोदारी पोहचली आहे. आगामी काळात देखील केंद्र व राज्य सरकार अधिक जोमाने कार्य करेल असा विश्वास आहे.

याप्रसंगी खा. धनंजय महाडिक . आ. प्रकाश आबिटकर, भरमुअण्णा पाटील, आमदार शिवाजीराव पाटील, गिरीजादेवी शिंदे, नाथाजी पाटील, संतोष तेली, शांताराम पाटील, जयवंत चांदेकर, उदयसिंह सरदेसाई, . केरबा पाटील, दीपक पाटील, ज्योतीताई पाटील, सचिन बल्लाळ, गंगाधर व्हसकोटी, हेमंत कोलेकर, साखरे अण्णा, अनिल शिवनगेकर, मायाप्पा पाटील,बाळ पोटे,समीर चाँद, आनंदराव देसाई, एन. टी. नवलाज, मा. सी. आर. देसाई यांच्यासह आजी-माजी सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.