महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन , सत्ता स्थापनेचा दावा केला

मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी महायुतीतील अनेक प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल होऊन राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला.

 

 

सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे प्रमुख नेते राजभवनावर पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे, तर या शपथविधीसाठी इतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि प्रमुख ही हजेरी लावणार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत लाड, पंकजा मुंडे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे रवींद्र चव्हाण, अशोक चव्हाण ,भाजपचे नेते विनोद तावडे, रत्नाकर गुट्टे ,विनय कोरे, आदी राजभवनात दाखल झाले होतेत.