कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत शाहूवाडी व हातकणंगले मतदारसंघाचे विजयी उमेदवार विनय कोरे व अशोकराव माने यांचा सत्कार उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केला. यावेळी विनय कोरे व अशोकराव माने यांनी भाजपाला पाठिंबा दिला.
शाहूवाडीत विद्यमान आमदार विनय कोरे यांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांचा ३६ हजार ५३मतांनी पराभव केला. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या तिरंगी लढतीत जनसुराज्य शक्ती व भाजपचे उमेदवार अशोकराव माने यांनी 46 हजार 397 मतांनी एकतर्फी विजय मिळवला . महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार राजूबाबा आवळे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुजित मिणचेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले .