हातकणंगलेच्या जनतेचा विश्वास पुन्हा जिंकू : राजूबाबा आवळे

कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा मतदारसंघात राजूबाबा आवाळे यांचा पराभव झाला. या पराभवाने खचून न जाता जनतेसाठी अविरत कष्ट करण्याची तयारी दाखवली आहे. राजूबाबा आवळे म्हणाले, हातकणंगले मतदारसंघातील जनतेने मला पाच वर्षे आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे जाहीर आभार मानतो.हातकणंगले मतदारसंघाच्या विकासकामाच्या मुद्द्यावर मी नुकतीच झालेली निवडणूक लढवली. पण तुमचा विश्वास जिंकण्यास मला अपयश आले.

 

 

हातकणंगलेतील मायबाप जनतेने दिलेला कौल मला मान्य असून तुमच्या सर्वांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी पुढील पाच वर्षे काम करत राहीन.या निवडणुकीत मला मतदान केलेले मतदार, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, हितचिंतक या सर्वांचा मी आभारी आहे.या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातील मतदार, जनता, युवक, माताभगिनींनी माझ्यासाठी काम केले. त्यासर्वांचे उपकार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते माझ्यासाठी गेली दोन महिने दिवसरात्र झटत राहिले त्या सर्वांचा मी आभारी आहे. त्यांच्या सोबत मी सदैव असेन. या निकालाने खचून न जाता आपण पुन्हा नव्या जोमाने कामाला लागून जनतेचा विश्वास पुन्हा संपादित करू आणि पुन्हा भरारी घेवूया.आपल्या सर्वांची साथ, पाठबळ, आशिर्वाद असेच मिळत राहतील अशी आशा आहे. अशा भावना राजूबाबा आवळे यांनी व्यक्त केल्या.

🤙 9921334545