मी आमदार म्हणजे करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती आमदार आहे : चंद्रदीप नरके

कोल्हापूर : मी आमदार म्हणजे करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती आमदार आहे असे प्रतिपादन महायुती शिवसेनेचे विजयी उमेदवार चंद्रदीप नरके यांनी केले. नरके म्हणाले, सर्वप्रथम करवीर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार. अभूतपूर्व विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी, वर्षा शिंगण यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले.

 

 

यावेळी विविध प्रसार माध्यमांची बातचीत केली. कोल्हापूर जिल्ह्यातील हुकूमशाही विरोधात दिलेला हा लढा यशस्वी झाला तो फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आणि नेहमीप्रमाणे आजपासूनच मी आपल्या सेवेत हजर आहे.

🤙 9921334545