कोल्हापूर: इचलकरंजी भाजपचे राहुल आवाडे व महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांच्यात दुरंगी लढत झाली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे 56, 811 मतांनी विजयी झाले. मुंबईतील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी भेट घेऊन महायुतीच्या महाविजयाबद्दल अभिनंदन केले.
यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल प्रकाश आवाडे विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.