भाजपला २१, शिंदे गटाला १२ तर अजित पवार गटाला १० मंत्रीपदे मिळण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मंत्रिपद वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. महायुतीत जिंकलेल्या जागांनुसार २१-१२- १० चा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

 

महायुतीने राज्यात २३६ जागा जिंकल्या. त्यातील १३२ जागा भाजप, शिवसेना ५७ व राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या. नवीन मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या निश्चित करण्यासाठी तिन्ही पक्षांनी नवीन फॉर्म्युला तयार केल्याचे कळते. भाजपचे २१, शिंदेंच्या शिवसेनेचे १२, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे १० जणांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे राज्यात ४३ जणांनाच मंत्री बनवण्याची तरतूद आहे. महायुतीतील तीन पक्षांनी जिंकलेल्या जागांनुसार, मंत्रिपदांचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे. सहा ते सात आमदारांमागे एक मंत्रिपद असू शकते. महायुतीतील तीनवेळा निवडणूक जिंकलेल्या आमदाराने सांगितले की, सहा ते सात आमदारांमागे एक मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्यास भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपला२२ ते २४ मंत्रिपदे मिळू शकतात. शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांना १० ते १२ मंत्रिपदे, तर अजित पवार गटाने ४० जागा जिंकल्याने त्यांना ८ ते १० मंत्रिपदे दिली जाऊ शकतात.

🤙 9921334545