शिवाजी पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपला पाठिंबा करीत असल्याचे पत्र केले सुपूर्त

कोल्हापूर:चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत असल्याचे पत्र दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल पांघरून त्यांचा सत्कार केला.

 

 

पंचरंगी लढत झालेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. शिवाजी पाटील 24,063 मतांनी विजयी झाले. विद्यमान आमदार राजेश पाटील, महाविकास आघाडीच्या नंदाताई बाभुळकर, जनसुराज्य पक्षाचे मानसिंग खोराटे आणि अपक्ष उमेदवार अप्पी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

🤙 9921334545