राजेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस रंगली होती. या मतदारसंघातून राजेश क्षीरसागर यांना ३०हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजेश क्षीरसागर यांनी भेट घेतली. आणि त्यांचे अभिनंदन केले.

 

 

यावेळी एकनाथ शिंदे यांनी क्षीरसागर यांना विजयी केल्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानत राजेश क्षीरसागर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले.

🤙 9921334545