विजयानंतर अशोकराव मानेंनी धैर्यशील मानेंची भेट घेऊन मानले आभार

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने १० च्या १० जागेवर घवघवीत विजय मिळवला. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या तिरंगी लढतीत जनसुराज्य शक्ती व भाजपचे उमेदवार अशोकराव माने यांनी ४६ हजार ३९७ मतांनी एकतर्फी विजय मिळवला. विजयानंतर अशोकराव माने यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घरी भेट घेऊन आभार मानले.

 

 

महायुतीने या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात घवघवीत अस यश संपादन केले आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उभारलेले हे सरकार लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरलं. असे मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.

🤙 8080365706